पुणे शहर
पुण्याचे महापौर आणि आयुक्तांचा गुजरात दौरा रद्द करा;आम आदमी पार्टीची मागणी

पुणे : महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणारा महापौर, आयुक्त यांच्यासह ३५ जणांच्या पथकाचा गुजरात दौरा रद्द करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने आयुक्तांकडे केली आहे.
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पालिकेचे विभागप्रमुख आणि काही मोजके पत्रकार असे ३५ जणांचे पथक गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या खर्चाने विमानाची तिकीटे बुक केल्याचे समजले आहे. या दौऱ्याला आम आदमी पार्टीचा विरोध आहे, असे पार्टीचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पुणे महापालिकेतील भाजपचा कार्यकाळ संपायला अवघा महिनाभर राहिला असताना, शिवाय कोरोनाची तिसरी लाट असताना असे दौरे म्हणजे उधळपट्टी आहे. हा दौरा रद्द करावा अशी मागणी पार्टीने केली आहे.




