पुणे शहर

विश्रांतवाडीमध्ये अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

Image

पुणे : मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबा दादाराव सकट (वय 30, रा. गोसावी वस्ती, हडपसर) या रिक्षाचालकाचा या विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एम एच 12 आरपी 26 33) हिचा आळंदी रस्त्यावरील म्हस्केवस्ती येथे अपघात झाला आहे. रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. त्यानुसार तात्काळ घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी अवस्थेतील रिक्षाचालकाला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिक्षाचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. नेमका अपघात कसा झाला हे समजू शकलेले नाही. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये