महाराष्ट्र

स्वरुप उन्हाळकरला आंतरराष्ट्रीय व पॅरालिंपिक स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

पुणे : टोकीयो पॅरालम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वरुप उन्हाळकर याच्या पुण्यातील नवीन घरी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन त्याचा गौरव केला. तसेच भविष्यात त्याला आंतरराष्ट्रीय आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

मूळचा कोल्हापुरचा असलेला स्वरुप उन्हाळकर हा अतिशय खडतर परिश्रम करून पॅराऑलिम्पिक पर्यंत पोहोचला होता. कोल्हापूरमधील सायबर कॉलेज येथे घड्याळ दुरुस्तीचे प्रशिक्षण घेताना त्याला नेमबाज प्रशिक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच त्याला नेमबाजीविषयी आवड निर्माण झाली. काहीसा महागडा असलेला हा खेळ आपल्याला परवडणारा नसल्याने त्याच्या आईने अगरबत्ती आणि बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. याची माहिती तत्कालीन कोल्हापूरचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना समजली. यानंतर त्याला त्यांनी स्वरुपचे पालकत्व घेत, त्याला नेमबाजीसाठी सर्वतोपरी मदत देऊ केली.

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळेच स्वरुपला पुण्यात आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंगकडून प्रशिक्षण मिळाले. स्वरुपनेही मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोन करत अतिशय कठोर परिश्रम घेत नेमबाजी स्पर्धेत प्राविण्य मिळवले. पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसह राष्ट्रीय पॅरा स्पर्धेतही त्याने आपला ठसा उमटवला. त्याच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनानेही त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

टोकियो येथे झालेल्या पॅरालम्पिक स्पर्धेत स्वरूप उन्हाळकर याने उत्कृष्ट कामगिरी केली. अनेक आव्हानांवर मात करत त्याने १० मीटर एअर रायफल प्रकारात प्रतिस्पर्ध्यांना कडवे आव्हान दिले. मात्र पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले. तरीही यातून खचून न जाता, पुढच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी त्याने आपली तयारी चालूच ठेवली आहे. त्याबद्दल पाटील यांनी स्वरुपच्या पुण्यातील घरी सदिच्छा भेट देऊन, त्याचा उत्साह वाढविला. तसेच आंतरराष्ट्रीय आणि पॅरालिंपिक स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Img 20220109 wa00179010930592176227098

यावेळी पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड अध्यक्ष पुनित जोशी, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर माजी उपाध्यक्ष राहुल कोकाटे आदी उपस्थित होते.

Img 20220105 wa00031311456043270984558

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये