नागरिकांनो सावधान : कोथरुडमध्ये चिनी मांजा करू शकतो घात..

कोथरूडमधील हा प्रकार म्हणजे सावधानतेचा इशारा..
कोथरुड : कोथरुड मधील पदपथावरून चालताय, रस्त्यावरून गाडी चालवताय तर सावध रहा, कारण पतंगाचा चिनी मांजा आपला घात करू शकतो. कर्वे पुतळ्याजवळ पदपथावर पडलेला चिनी मांजा पायात अडकल्याने पादचारी पडता पडता वाचले त्यामुळे हा मांजा कधीही घात करू शकतो, त्यामुळे सावधान
चिनी मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही तो मुलांना पतंग उडवण्यास मिळतो म्हणजे तो ठराविक ठिकाणी विक्रीस आहे हे नक्की. हा मांजा रस्त्यावर आडवा आल्याने शहरात काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे. काल असाचकाही प्रकार घडला. कर्वे पुतळा चैकाजवळील पदपथावर पडलेला चिनी मांजा लोकांच्या पायात अडकत होता, पायात काहीतरी अडकलय हे जाणवत होते पण डोळ्यांना दिसत नव्हते. या प्रकारात दोन जण मांजा अडकल्याने पडलेही असते. एकजणाने शेवटी तो मांजा शोधला व गुंडाळून घेतला त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. हाच मांजा जर रस्त्यावर आडवा अडकला असता तर काही झाले असते हे सांगायला नको.
हा प्रकार चालू असताना दोन मुले तुटलेला पतंग घेऊन तेथून पळत चाललेली होती त्यांना अडवले असता सुरवातीला त्यांनी मांजा आमचा असल्याचे सांगितले पण प्रकार लक्षात आल्यानंतर तो आमचा नसून पतंग आम्हाला सापडल्याचे त्यांनी सांगितले, पण असा मांजा गुजरात कॉलनीतील एका दुकानात मिळतो असे त्यांच्या बोलण्यात आले. त्यामुळे चिनी मांजा मार्केट मध्ये उपलब्ध आहे, याला एक प्रकारे दुजोराच मिळाला आहे. पण हा मांजा प्रशासनाने शोधून विक्रेत्यांवर कारवाई करणे फार गरजेचे आहे. काल शहरात मांजा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र शहरातील उपनगरांमध्ये ही चिनी मांजाची विक्री चालू असून त्याबाबतही प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. नाहीतर मोठी अनर्थ घटना घडू शकते. याबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.








One Comment