पुणे शहर

अपहृत मुलाची माहिती देण्यासाठी खंडणीची मागणी करणाऱ्या युवकाला पुण्यात अटक

पुणे : अपहरण झालेल्या मुलाच्या वडीलांना दुरध्वनी करून मुलाची माहिती देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आनंद उर्फ अक्षय हनुमंत शिर्के (वय 27, रा. आळंदवाडी, ता. भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातून एका लहान मुलाचे अपहरण झाले आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस घेत आहेत. लहान मुलाचे अपहरण झाल्यामुळे कुटुंब दु:खात असून, मुलाचा तपास लवकर लागावा म्हणून पालकांनी एफबीवरून त्याबाबत माहिती दिली होती.

शिर्के हा भोर तालुक्यातील आळंद येथील एका कंपनीत काम करतो. त्याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने ही पोस्ट वाचून त्या ठिकाणी असलेल्या क्रमांकावर दुरध्वनी केला. संबंधित व्यक्ती मुलाचे पालक असल्याची खात्री केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांच्या संदेश पाठवून तुमच्या मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असल्याचे सांगितले. त्या वेळी मुलाच्या पालकांनी मुलाचे व गाडीचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. मात्र, पैसे दिल्याशिवाय काहीही पाठविणार नसल्याचे आरोपीने सांगितले.

त्यामुळे पालकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दुरध्वनी करणाऱ्या मुलाचा माग काढला. त्या वेळी तो भोरमधील आळंदवाडी येथे असल्याचे समजले. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पो, वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, उत्तम तारू, मितेश चोरमोले, चेतन गोरे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये