पुणे शहरमहाराष्ट्र
पुण्यासह राज्यात ऊद्या पहाटे पासून थंडीचा कडाका वाढणार ; किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता…

पुणे : पुण्यासह राज्यात किमान तापमान उद्या पहाटे खाली जाण्याची दाट शक्यता असून मध्य महाराष्ट्रात खास करून उत्तर भागात पुणे,नाशिक व आसपास प्रभाव जाणवणार, असं पूर्वानुमान (IMD) हवामान खात्याने दिले आहे. काही ठिकाणी एक अंकी नोंद शक्यता.
मुंबई/आसपास किमान तापमान 14°C च्या आसपासची शक्यता.काही दिवस ट्रेंड राहील.गेल्या काही दिवसांपासून राज्यांत तापमानाचा पारा खाली आला आहे. आज पुण्यात १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.







