पुणे शहर

दगडूशेठ गणपती मंदिरात जन्म सोहळ्यास प्रारंभ

पुणे : लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात माघ शुद्ध चतुर्थीनिमित्ताने गणेश जन्म सोहळ्याला आज शुकवारी पहाटेपासून प्रारंभ झाला.

मंदिरात पहाटे ३ वाजता गणपतीला ब्रह्मणस्पति सूक्त अभिषेक करण्यात आला. पहाटे ४ ते ६ आळंदी येथील अवधूत गांधी यांनी स्वराभिषेक कार्यकम सादर केला. दुपारी बारा वाजेपर्यंत गणेश याग होईल आणि बारा वाजता गणेश जन्माचा सोहळा संपन्न होईल.

गणेश जन्म सोहळ्यानिमित्ताने मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली असून कळसावरही फुलांची सजावट केली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये