राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करा.युवासेनेकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबाद येथे जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जाणून बुजून अपमानास्पद वक्तव्य केले. तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार युवासेनेकडून दाखल करण्यात आली आहे.
युवासेना पदाधिकाऱ्यांनी अलंकार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून त्वरित बडतर्फ करावे अशी मागणी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी सांगितले.

पळसकर म्हणाले, समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले असते का? असे वक्तव्य केले. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व रामदास स्वामी नसते तर शून्य झाले असते अश्या आशयाचे वक्त्यव्य करून व त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अवमान केला. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे केंद्र सरकार व राज्य सरकार च्या महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ठ असून राष्ट्रपुरुषाचा असा अवमान केल्या प्रकरणी व रामदास स्वामींना मोठेपण देताना महाराजांना लहान करणे अतिशय निंदनीय आहे. यामुळे समाजात दुही निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीने चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडणे अतिशय घातक आहे.
यावेळेस युवासेनेचे विधानसभा अधिकारी राम थरकुडे,आनंद भिलारे,आकाश झंजले,वैभव दिघे,मयूर भालेकर,गणेश काकडे,रोहित पळसकर,अनीराज कुन्हाडे,संतोष पौळ,कैलास मोरे,देविदास पवार व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.






