पुणे शहर

कर्वेनगरमध्ये पालिकेच्या शहीद भगतसिंग ग्रंथालयाचे लोकार्पण..

पुणे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे ग्रंथालय..

पुणे : “विकासकामांच्या गर्दीत ग्रंथालयाला स्थान देणे ही नक्कीच आनंददायी गोष्ट असून अनेक निरुपयोगी गोष्टींवर खर्च करण्याऐवजी समाजाचा शाश्वत विकास करण्यावर आपण दिलेला भर हा महत्वपूर्ण वाटतो.” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांच्याबद्दल काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून व नागरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शहीद भगतसिंग ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रभाग क्रमांक 31 कर्वेनगर वारजे परिसरातील वारजे सर्व्हे नंबर 18 दत्त दिगंबर कॉलनी- वसंत कमल विहार सोसायटी लगत हे शहीद भगतसिंग ग्रंथालय उभारण्यात आले आहे.  जवळपास दोन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये लक्ष्मी दुधाने यांच्या महापालिकेच्या ८० लाख रुपये सह यादी निधीतून  हे ग्रंथालय विकसित करण्यात आले असून  पुणे शहरातील महापालिकेचे हे सर्वात मोठे ग्रंथालय आहे.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

अरुण ढेरे पुढे म्हणाल्या, हे तब्बल २५०० पुस्तकांचा ठेवा असणारे ग्रंथालय भविष्यात पुणेनगरीची वाचन संस्कृती टिकवण्याचे व वाढवण्याचे काम समर्थपणे करेल, असा विश्वास वाटतो. आपल्या अमोघ वाणीने पुस्तके व वाचनाचे महत्व त्यांनी श्रोत्यांना पटवून दिले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

यावेळी  माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष  काका चव्हाण,  नगरसेविका सायली वांजळे, रेश्मा बराटे,  संगीता  बराटे, ज्येष्ठ साहित्यिक वि. दा. पिंगळे, पोपट फेंगसे, संतोष बराटे, सुनीता पवार, दीपक चांगुडे, विनायक देशमुख, राहुल पोटे, किशोर शेडगे, गजानन कड, पल्लवी शेडगे यांच्यासह प्रभागातील अनेक वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी आणि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वप्नील दुधाने यांनी केले तर  सूत्रसंचालन समिता थोरवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये