पुणे शहर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा कुशासनाचा होळी करून निषेध

पुणे : पाषाण-सुतारवाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी चा कारभाराची होळी करून निषेध पुणे शहर भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी केला
महाविकास आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार,महिलांन वरील अत्याचार, सरकारी अधिकारी बदलीतील भ्रष्टाचार,दहशतवादी लोकांशी असलेले मंत्री, शेतकरी विरोधी धोरण, एस.टी.कामगार बद्दल ची अनास्था अशा अनेक धोरणांचे दहन होळी मध्ये करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध कोकाटे तालिम पाषाण येथील होळी कार्यक्रमात करण्यात आला
यावेळी उत्तम जाधव, भुषण कोकाटे, प्रदीप खोंड,हणमंत कोकाटे, संग्राम कोकाटे, नेताजी कोकाटे, विनायक कोकाटे, कृष्णा कोकाटे, प्रज्वल कोकाटे, आदित्य पाषाणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते




