राजकीय

चंद्रकांत पाटलांच्या नव्या तारखेची आम्ही वाट पाहतोय : एकनाथ खडसे

जळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. मात्र सर्व तारखा निघून गेल्या असून चंद्रकांत पाटलांच्या नवीन तारखेची आम्ही वाट पाहत आहोत, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तर, अनेक आमदार संपर्कात असल्याचं रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत आहेत, असा टोला खडसे यांनी हाणला आहे.

मुक्ताईनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. मनसेपासून ते एमआयएमपर्यंत सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आगामी काळात आपणच सत्तेत येणार असल्याचे वक्तव्य करतात. तसेच चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सत्तेवर येणार असल्याचे चित्र रंगवत आहेत. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी वस्तुस्थिती समोर येईल. आत्ताच अंदाज व्यक्त करणं अवघड आहे,’ असं एकनाथ खडसे म्हणाले. प्रवीण दरेकर यांच्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्याबाबतच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मात्र, ही फाइल कायमची बंद झाली असा त्याचा अर्थ होत नाही. या प्रकरणात चौकशी अंती जे तथ्य समोर येईल त्यावरून जी कार्यवाही व्हायची ती होईल, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये