लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घट

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीनं देशातील जनतेला दिवाळीचं मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दोन्ही इंधनाच्या दरांवरील सेंट्रल एक्साइज ड्यूटी मध्ये घट करणार असल्याची घोषणा केली होती. पेट्रोलवर यामध्ये 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

दिल्लीत इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपावर प्रति लिटर 6.07 रुपयांनी घट होऊन 103.97 रुपयांवर पोहोचलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 110.04 रुपये होती. याप्रमाणे डिझेलच्या दरांत 11.75 रुपयांची घट होऊन 86.67 रुपये प्रति लिटरपर्यंत आलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 98.42 रुपये प्रति लिटर इतकी होती.



गेल्या 26 दिवसांत 8.15 रुपयांनी महागलं होतं पेट्रोल
गेल्या सप्टेंबर महिन्यात 28 तारखेला पेट्रोलचे 20 पैशांनी महागलं होतं. तर डिझेल 25 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. तर गेल्या मंगळवारपर्यंत हे दरवाढीचं सत्र सुरुच राहिलं. मधे काही दिवस या दरवाढीला स्थिरता मिळाली. तसेच गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रति लिटरनं महागलं होतं.






29 दिवसांत 9.45 रुपयानं महागलं डिझेल
गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसं पाहिलं तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेल तयार करणं अधिक खर्चिक आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकलं जाते. गेल्या 24 सप्टेंबरपासून डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ही दरवाढ गेल्या आठवड्यात मंगळवारी येऊन थांबली होती. यावेळी पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली होती. गेल्या 29 दिवसांत ते 9.35 रुपये प्रति लिटर महागलं आहे.





































































