पुणे शहर

वारजेतील कै. शामराव श्रीपती बराटे शाळेला शिक्षक मिळणार कधी ? उद्या बैठक, निर्णय नाही झाल्यास आंदोलन : बाबा धुमाळ

वारजे : वारजे माळवाडी येथील महापालिकेच्या येथील कै. शामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यम शाळेत आवश्यकतेपेक्षा कमी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी शाळेला शिक्षक मिळण्याबाबत शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार चार शिक्षक वाढवून देण्यात आले होते तशी ऑर्डर ही काढण्यात आली होती. हे शिक्षक गुरुवारी रुजू होणार होते, परंतु रुजू होण्याआधीच हे शिक्षक रजेवर गेल्याने पुन्हा जैसे थे प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी उद्या शिक्षण प्रमुख उपशिक्षण प्रमुख यांच्या बरोबर बैठक आयोजित केली असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गुरुवार २६ ऑक्टोंबर रोजी उपायुक्त नंदकर, शिक्षण प्रमुख राठोड, उपशिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण, सहायक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका व दोन्ही शाळांचे मुख्याध्यापिका यांच्या समवेत साडे बारा वाजता बैठक आयोजीत करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यम शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गाच्या प्रत्येकी दोन- दोन तुकड्या आहेत. या १४ वर्गांसाठी किमान प्रत्येकी एक प्रमाणे १४ शिक्षक अपेक्षित आहेत. परंतु सध्या चार शिक्षक आहेत. त्यापैकी एका शिक्षिकेला आजारी आहेत. त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात त्यांच्याकडील वर्ग शिकवता येणार नाही. सध्या त्यांच्याकडे पाचवीचा म्हणजेच स्कॉलरशिपचा वर्ग देण्यात आला होता. त्यांनी त्याप्रमाणे तयारी देखील केली होती. परंतु आता त्या शाळेत येऊ शकत नाही. म्हणजे शाळेत १४ वर्गांसाठी सध्या तीन कायम (परमनंट) शिक्षक आहेत. कंत्राटी शिक्षकांमध्ये अनिमियताता आहे.

त्यामुळे शाळेला किमान सात आठ कायम (परमनंट) शिक्षक आणि सात कॉन्ट्रॅक्ट टीचर देण्यात यावेत. यामध्ये शिक्षक देताना जास्तीत महिलांचा समावेश असावा अशी पालकांची मागणी आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची वेळेत नेमणूक झालेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्वीपासूनच पाठीमागे राहिलेला आहे. या प्रकारामुळे पालकही आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

या विषया संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर चार शिक्षकांच्या ऑर्डर काढण्यात आली होती पण ते रुजू झाल्याचे दिसत नाही उद्या बैठक आयोजित केली आहे. यात तातडीने निर्णय नाही झाल्यास पालकांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा बाबा धुमाळ यांनी दिला आहे.

Img 20230717 wa0012281293529283828163631407
Img 20230511 wa0002282293142767040474980887

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये