युवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील- अमोल बालवडकर

कोथरूड : सागर बालवडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने चांदणी चौक येथील चांदणी लॉन्स येथे आयोजित युवा संवाद व स्नेह भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सर्व युवकांशी अमोल बालवडकर यांनी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले. अमोल बालवडकर म्हणाले,कोथरूड विधानसभा मतदारसंघातील युवकांच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. निवडणुका येतील आणि जातील पण आपले जिव्हाळ्याचे संबंध असेच टिकवून ठेऊया, जेणेकरून प्रत्येकाच्या अडचणीत सहभागी होऊन एकजुटीचे परिस्थितीचा सामना करता येईल.

तसेच आपल्या देशाच्या आणि परिसराच्या विकासात युवक महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे युवकांची मोलाची साथ मिळाली तर कुठलेही कार्य असो, ते पूर्णत्वास आणणे सहजशक्य होईल. परिसरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच प्रत्येक युवकाला रोजगार मिळावा या उद्देशाने सोबतीने काम करूया आणि शाश्वत विकासाकडे सर्वांनी वाटचाल करूया असे आवाहन बालवडकर यांनी उपस्थित सर्वांना केले.









