पुणे शहर

साडेबाराला सुटणाऱ्या विमानाच्या उड्डाणाची दोन वेळा बदलली वेळ, तब्बल पाच तासानंतर उड्डाण; पुणे विमानतळावर प्रवाशांना नाहक मनस्ताप

पुणे : पुणे विमानतळावरून 12.30 ला सुटणारे स्पाईसजेटचे पुणे ते गोवा विमान कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानक 4.30 ला सुटणार असे जाहीर करण्यात आले.  त्यानंतर परत विमानाची वेळ बदलण्यात आली आणि ५.४५ ला विमानाने गोव्यासाठी उड्डाण केले. यावेळी स्पाइसजेट कंपनीकडून कोणीही माहिती देण्यास उपलब्ध नसल्याने प्रवाशी संतप्त झाले.

पुणे ते गोवा विमान प्रवासासाठी रविवारी सकाळी 10:30 वाजता प्रवाशांनी पुणे विमानतळावर चेक इन केले. मात्र अचानक स्पाइसजेट कंपनीने विमानाच्या वेळेमध्ये बदल करण्याचे घोषित केले. प्रवाशांना हा काय प्रकार आहे? हे समजण्यास मार्ग नव्हता याठिकाणी कंपनीचा कोणताही माणूस प्रवाशांशी चर्चा करण्यास तयार नव्हता. अखेर दोन – तीन तासानंतर स्पाइस जेट चे अटेंडंट प्रवाशांसमोर आले. यावेळी संतप्त प्रवाशांचा धीर संपला.आणी प्रवाशी आणि कंपनी च्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड वाद झाले. याचे कारण म्हणजे स्पाइस जेट चे अटेंडंट फारच उद्धटपणे वागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

Img 20230812 wa0001281297517832967883010071

याबाबतीत बोलताना प्रवाशी अनिरुद्ध खांडेकर म्हणाले, कंपनीने प्रवाशांना न कळवता अचानक विमानाच्या वेळेमध्ये बदल केला. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने होते. अर्ध्या तासाच्या अंतरावर प्रवासासाठी नागरीकांना 6-7 तास प्रतीक्षा करावी लागली. तर कंपनीचे कर्मचारी अतिशय उद्धटपणे प्रवाशांशी बोलत होते. याविषयी कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि प्रवाशांची माफी मागायला हवी.

Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20221228 wa0001282294128958397815578022

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये