पुण्यात उत्तमनगर भागातील गॅरेजला भीषण आग, दोन बस जळून खाक ; पहा व्हिडिओ

पुणे : pune city पुण्यातील उत्तमनगर येथील कोपरे गावातील गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत fire दोन बस जळून खाक झाल्या आहेत, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग एवढी भयंकर होती की स्फोट झाल्यासारखे आवाज येत होते. पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीच नेमके कारण समजू शकले नाही.
उत्तमनगर भागात कोपरे गाव येथे बस दुरुस्ती करणारे मोठे गॅरेज आहे. शनिवारी रात्री उशीरा साडेअकरा गॅरेजमध्ये अचानक आग लागली. या आगीत गॅरेजमधील गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गॅरेजच्या आगीत दोन खासगी बस जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगीची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.




