पृथ्वीराज सुतार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मेट्रो प्रशासनाला आली खडबडून जाग ; या कामाला केली सुरवात..

पुणे : पुणे शहरामध्ये कोथरुड मधील वनाझ ते नगर रस्त्यावरील रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गाचे काम महामेट्रो मार्फत सुरु आहे. मात्र ज्या रस्त्यांवर ही कामे सुरू आहेत त्या रस्त्यांवर या कामांमुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे हाल होत होते. असे असले तरी मेट्रो प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत होते. या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाला जाग आली असून मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास महामेट्रो प्रशासनाकडून सुरवात करण्यात आली आहे. After the warning of Prithviraj Sutar’s agitation, the metro administration woke up …
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबतचे निवेदन सुतार यांच्याकडून महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांना देण्यात आले होते. आठ दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने सुतार यांना महा मेट्रोच्या प्रकल्प विभागाकडून रस्त्यांची डागडुजी केली जात असल्याचे पत्र पाठवत केलेल्या कामाची छायाचित्र पाठवण्यात आली आहेत.
मेट्रो चे काम सुरू असलेल्या मार्गावरील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे मोठे खड्डे पडले होते त्यातच काम चालू असलेल्या ठिकाणचे स्ट्रीट लाईटचे पोल काढले असल्यामुळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार असायचा त्यामुळे रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी व खड्डे याचा आंदाज येत नसल्याने अपघात घडत होते. या कारणामुळे रस्ते अपघातात जीवित हानी झाल्यास त्याला महामेट्रो जबाबदार राहणार का असा प्रश्न विचारत पृथ्वीराज सुतार यांनी महामेट्रोला धारेवर धरले होते.
मुळात सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या हेतूने मेट्रोचे काम करत असताना, दैनंदिन वाहतूक होत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था होणार नाही याची खबरदारी महामेट्रो प्रशासनाकडून घेण्यात न आल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता खड्डे बुजवण्यात आल्याने नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. तसेच यापुढेही कामे करताना खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी मेट्रो प्रशासनाला केले आहे.




