कर्वेनगरमध्ये एक दिवा शेतकरी व भारतीय सैनिकांसाठी ; मोरया मित्र मंडळाकडून दिपोत्सव साजरा
कर्वेनगर : सीमेवर दिवस रात्र देशाचे रक्षण करणारे भारतीय सैनिक आणि शेतात आहोरत्र घाम गाळून अन्न पिकविणारे शेतकरी यांचे देशासाठी असणारे योगदान अनन्य साधारण आहे. याच कारणामुळे एक दिवा सैनिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत कर्वेनगर मध्ये दिपोत्सव साजरा करण्यात आला.
मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने दरवर्षी दिवाळी मध्ये दिपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी अनोखा दिपोत्सव साजरा करत सैनिक व शेतकरी यांच्या प्रती एक दिवा लावत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ह्या दिपोत्सवामध्ये परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी आरती लोनकर गुंजाळ, दिव्या दानवले, संचिता काळे, नूतन जोशी यांनी जय जवान जय किसान ह्या विषयावर अतिशय सुंदर रांगोळी साकरली होती. रांगोळी मध्ये शेतकरी आणि सैनिक फोटो साकारुन शेतकरी सैनिकांच्या ऋणानुबंध प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेवतांना शेतकऱ्यांचे व झोपतांना जवानांचे आभार मानायला विसरू नका असा संदेश देण्यात आला.
यावेळी जय जवान जय किसान असा उल्लेख करुन रांगोळी भोवती ५०१ दिव्यांची आरास करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. परिसरातील सर्व महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिपोत्सवला करण्यात आली.
यावेळी पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष विजय खळदकर मोरया मंडळाचे उपाध्यक्ष रोहित दानवले, कार्याध्यक्ष अक्षय केसवड खजिनदार गणेश गायकवाड, ऋषीकेश जगताप, सागर शिगवण, गणेश शिंदे, स्वाती दारवटकर, संगिता गोरड, संगिता भरम, सुशीला नालगुडे, वैशाली गोरड आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी मारणे म्हणाले, आपल्या ताटात जेवण मिळते ते शेतकऱ्यामुळे म्हणून दररोज जेवताना शेतकऱ्यांना एक धन्यवाद दिला पाहिजे. तसेच आपण दररोज शांतचित्ताने झोपतो परिसरात वावरतो ते सीमेवर असलेल्या जवानांमुळे म्हणून जवान आणि शेतकरी यांच्या प्रतिज्ञापोटी एक छोटासा प्रयत्न धन्यवाद बोलण्याचा म्हणून एक दिवा जवान आणि शेतकऱ्यांसाठी असा उपक्रम आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने राबवण्यात आला.