कुमार कोथरुड किताबाचा मानकरी ठरला मुळशीचा पै निरंजन मारणे
पुणे : पुणे जिल्हास्तरीय कोथरुड चषक कुस्ती स्पर्धा कोथरुड (केळेवाडी) मामासाहेब मोहोळ मनपा शाळेमधे पार पडली. ह्या स्पर्धेमधे पुणे जिल्हातील पैलवानांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तब्बल 360 कुमार पैलवानांचा सहभाग ह्या स्पर्धेमधे नोंदवला गेला. स्पर्धेचे आयोजन पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी अतिशय भव्य दिमाखात केले होते.
या स्पर्धेचे उद्धाटन हर्षवर्धन दीपक मानकर यांनी केले. अंतिम कुस्तीमधे पै निरंजन मारणे विरुद्ध पृथ्वीराज कोकाटे झालेल्या लढतीमधे निरंजन ने रोमहर्षक विजय मिळवला आणि मानाची गदा आपल्या खांद्यावर घेतली. बक्षीश समारंभ संतोष डोख पै अमर गायकवाड़ यांनी केला. प्रमुख पाहुने बबनराव काशिद उप महा केसरी संभाजी (अप्पा)शिंदे निम्हंन सर सुधीर साठे (PSI) सागर खळदकर पै अनुदान चव्हाण उपस्थित होते.
संयोजन कमिटी पै शार्दुल मांडेकर,योगेश कडु, पै गणेश मानकर,वस्ताद गजानन पांचगे यानी काम पाहिले.
गटानुसार विजेते पुढीलप्रमाणे
25 किलो
प्रथम ओंकार मिसाळ
दृतिय न्यानेश्वर बरखड़े
30 किलो
प्रथम अजिंक्य राणवडे
दृतिय रुद्रप्रताप साबळे
35 किलो
प्रथम सिद्धांत मोरे
दृतिय सोहम मते
40 किलो
प्रथम आरुष चव्हाण
दृतिय सार्थक शिर्के
45 किलो
प्रथम ओम नखाते
दृतिय सार्थक दिघे
51 किलो
प्रथम आर्यन इंदलकर
दृतिय यश शेलार
57 किलो
प्रथम शिवराज पायगुडे
दृतिय तेजस काटके
61 किलो
प्रथम राहुल कुंभारकर
दृतिय शुभम आतकरे
65 किलो
प्रथम विक्रम सावंत
दृतिय अथर्व आंबेकर
70 किलो
प्रथम यश नलावडे
दृतिय मोसिम शेख
74 किलो
प्रथम तनिष्क कदम
दृतिय रोहित दिघे
ओपन गट
प्रथम निरंजन मारणे
दृतिय पृथ्वीराज कोकाटे