पुणे शहर

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले आणि त्यामुळेच हे यश सामूहिक आहे,संकटच्या काळात पुणेकर एक होवून लढतात हा लौकिक कायम राखला याचा अभिमान वाटतो असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आणि  संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत महापौर, स्वयंसेवी संस्था प्रमुख व मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार आणि क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस विजय कुंभार,सुराज्य संघर्ष समिती,महेश झगडे,माजी आयुक्त, पुणे महापालिका,मधुकर चौधरी, माजी मिशन डायरेक्टर,एनआरएचएम, संदीप खर्डेकर,अध्यक्ष क्रिएटिव्ह फौंडेशन,प्रा.मोहन गुप्ते ,माजी संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ़ इपिडेमॉलॉजी
किशोरी गद्रे,माजी उपजिल्हाधिकारी,विनिता देशमुख, जुगल राठी, सजग नागरिक मंच डॉ.सचिन नगरकर यांच्यासह मनपा अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल,आरोग्य प्रमुख आशीष भारती,उप आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे,उपायुक्त सुनिल इंदलकर उपस्थित होते.

Img 20201114 wa0195

स्वयंसेवी संस्थांच्या सूचनांचा निश्चितच विचार करु व अभ्यास करुन त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.तसेच केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही महापौरांनी स्पष्ट केले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

माजी आयुक्त महेश झगडे यांनी मनपाने कोरोना काळात अतिशय उत्तम काम केल्याचे सांगितले. मात्र आरोग्य खात्यात ४५% जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी मनपा ने राज्य सरकार कडे तातडीने मागणी करावी असे आवाहन केले.तसेच या पदांची अर्हता बदलली तर अधिक कर्मचारी उपलब्ध होतील आणि मनपा स प्रभावीपणे संसर्गजन्य आजारांवर मात करता येइल.सत्ताधाऱ्यांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते याची खंत वाटते असेही ते म्हणाले.

विजय कुंभार यांनी आरोग्य खात्यातील विसंवादावर बोट ठेवताना निदान अश्या युद्धजन्य परिस्थितीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय व संपर्क ठेवून काम करावे असे सांगितले.तसेच विनामास्क फिरताना जेव्हा दंड आकारतात तेव्हा दंडाच्या पावतीसोबत मास्क ही द्यावा अशी सूचना केली तसेच महापौर यांनी सर्व दुकानदारांना सार्वजनिक ठिकाणी हॅंड सॅनिटायझर स्टॅंड बसविण्याचे आवाहन करावे आणि ज्याप्रमाणे सार्वजनिक पाणपोई किंवा पीकदाणी / थुंकदाणी असते तसेच यांचे स्वरुप असावे व त्यातील रिफिलींग ची जबाबदारी त्या भागातील दुकानदारांनी स्वीकारावी यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा असे सुचवले.
भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी महापौर पदाची  वर्षपूर्ती पूर्ण केली असून सुसंवादातून प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले.तसेच विविध प्रश्नांवर भाजप चे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सकारात्मक असून यापुढे वारंवार अश्या बैठकांच्या माध्यमातून शहराचा अधिक विकास साधण्याचा प्रयत्न करणार आल्याचे सांगितले.

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये