समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेसह चिमुरडीचा मृत्यू

वाशिम : समृद्धी महामार्गावर कारंजा येथे भीषण अपघात घडला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर अकोला येथे उपचार सुरु आहेत. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी गाडीबाहेर उडून काही फूट अंतरावर जाऊन पडली, असे स्थानिकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघात झाला त्यावेळी गाडीत चारजण उपस्थित होते.
बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर ते शिर्डी प्रवास करत या मार्गाची चाचणी केली होती. या संपूर्ण महामार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने केली आहे.




