पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

पुणे : काल शुक्रवारी निर्भय बनो कार्यक्रमासाठी आलेल्या निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या तसेच शाई फेक ही करण्यात आली होती. या हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज अटक केली आहे.
या हल्ला केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून माजी नगरसेवक दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुष्यंत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत श्रध्दा वसंत जाधव यांनी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
शुक्रवारी दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी सभागृहात निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार निखिल वागळे उपस्थित राहण्यासाठी येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. गाडीवर शाईफेक करण्यात आली होती तसेच काचाही फोडण्यात आल्या होत्या. निखिल वागळे यांच्या बरोबर गाडीत ॲड. असिम सरोदे, विश्वंभर चौधरी, हे देखील होते. या प्रकारानंतर निखिल वागळे यांनी कार्यक्रमस्थळी पोहचून भाषण केले व भाजपवर जोरदार टीका केली होती. आपण या हल्ल्यातून बचावलो असून आपण जिवंत असेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे वागळे यांनी म्हंटले होते.






