कोथरूडमध्ये पार पडली नमो चषक रोलर स्केटिंग स्पर्धा ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
कोथरूड : कोथरूडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक रोलर स्केटिंग roller skating स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महेश विद्यालया समोरील रस्त्यावर ही नमो चषक रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा विविध गटातील मुले आणि मुलींसाठी क्वाड आणि इनलाइन प्रकारात घेण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष अमित तोरडमल, डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस दीपक पवार, अनुराधा एडके, सायंदेव डेहद्राय, आदित्य केसरी, आदित्य बराटे, प्रदीप जोरी , सुरेखा जगताप, बाळासाहेब टेमकर, पार्थ मठकरी, शुभम मारगळे, आसिफ तांबोळी आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धा आयोजन प्रसंगी रोलर स्केटिंग खेळाचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ मार्गदर्शक अशोक गुंजाळ आणि राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक धीरज उभे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.