राज्यसभेत महागाई, जीएसटीच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे 19 खासदार निलंबित

नवी दिल्ली : राज्यसभेत जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सात खासदारांस 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित (Rajya Sabha MPs suspended) करण्यात आले आहे.
खासदार सुष्मिता देव (MPs Sushmita Dev) , डॉ. शंतनू सेन (Dr Santanu Sen) आणि डोला सेन ( Dola Sen) यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सहा खासदारांना आणि इतर पाच खासदारांना आठवड्याभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी, महागाईसह विविध मुद्द्यावर या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे या खासदारांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून विरोधकांनी महागाई आणि जीएसटी सारख्या मुद्द्यांवर आक्रमकपणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आज गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी टीएमसीकडून करण्यात आली होती. पण याबाबत चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले. सभागृहात घोषणाबाजी केली.




