महाराष्ट्र

अजित पवार वर्षा बंगल्यावर


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचे दर्शन घेत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे घातले.

यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.पवार यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायांचं दर्शन घेतलं आणि महाराष्ट्रावरचं कोरोनाचं संकट दूर करून राज्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ दे, अशी प्रार्थना केली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये