१६ व्या राज्यस्तरीय सिलम्बम चॅम्पियनशीप स्पर्धेत पुण्याच्या संघाची बाजी !

पुणे : दिवा प्रतिष्ठान आणि केळेवाडी येथील श्री सद्गुरु कला क्रीडा केंद्र यांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून कोथरूड मधील केळेवाडी – रामबाग कॉलनी प्रभागातील मुला-मुलींसाठी “लाठी-काठी “ प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गातील संघाने नाशिक येथे झालेल्या “१६ व्या राज्यस्तरीय सिलम्बम चॅम्पियनशीप २०२२-२३” स्पर्धेत तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशीप पटकावून पुण्यनगरीचा अभिमान उंचावला.
दीवा प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या आणि प्रशिक्षक आदित्य केंजळे यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करून खेळाडूंनी एक सुवर्ण, २ रजत आणि ३ कांस्यपदके पटकाविली. एकूण २० मुली आणि १ मुलगा अशा एकूण २१ जणांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.यावेळी हर्षवर्धन मानकर,दिलिप कानडे राहुल गांजवे, अनामिका गांजवे, सुलक्षणा चव्हाण उपस्थित होते.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, आपण लावलेल्या झाडाची फळे चाखताना जो अवर्णनीय आनंद असतो तशीच भावना यावेळी मनात दाटून आली. दिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाला शालेय मुला-मुलींनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि ती गाठत असलेले यश कौतुकास्पद आहे.







