पुणे शहर

चला…भात लावणीला या मनसेच्या वतीने केलेल्या उपक्रमासाठी उदंड प्रतिसाद

पुणे : चला…भात लावणीला या मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गाची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. लावणी करताना पारंपारिक गावातील महिला आणि पुरुष मंडळींच्या मार्गदर्शनाने भात लावणी कशी करावी, या सर्व प्रक्रिया जाणून घेतल्या.

नवीन काहीतरी शिकण्या बरोबर चिखलात खेळण्याचा आनंद असा द्विगुणी आनंद करण्याचा कार्यक्रम मनसे उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे आणि स्नेहल शिंदे यांनी आयोजित केला होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास मनसे सरचिटणीस अँड. किशोर शिंदे, विभाग अध्यक्ष सुधिर धावडे, विराज डाकवे,समीर मुलाणी,संतोष सणस,किरण बोडके,राहुल मारणे,प्रतिक कंधारे, आदी सभासद उपस्थित होते.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये