पुणे शहर
देवाशिष फाउंडेशन व ओवी बचत गटातर्फे वनाज परिवार हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप

पुणे : देवाशिष फाउंडेशन व ओवी बचत गटातर्फे आज वनाज परिवार हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन कांचन कुंबरे यांनी केले होते.
या कार्यक्रमास कोथरुड पोलिस ठाण्याच्या एसीपी पहिल्या लेडी एन्काऊंटरर रुक्मिणी गलांडे, राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच आयोजक कांचन कुंबरे, उद्योजिका पल्लवी शिवकुमारश्री, सीमा दळवे, अश्विनी भालेकर, सुनेत्रा शिंगणवाडे, आरती वाचासुंदर उपस्थित होत्या.










