पुणे शहर

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री जाहीर होताच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत, पेढे वाटत जोरदार जल्लोष

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्री पदाची जबाबदारी जाहीर करण्यात आली. यानंतर पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे वाटत जोरदार जल्लोष साजरा केला.

अजित पवार महायुती सोबत सत्तेत सहभागी झाल्यापासून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे पवार यांच्याकडे जाणार अशी जोरदार चर्चा होती. अखेर मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, अजितदादांचे खूप खूप अभिनंदन , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिळावे, अशी सर्वसाधारण कार्यकर्त्यांची इच्छा होतीच.

अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचा विकास होणार, याची खात्री आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांनाही ठिकठिकाणी पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वच मंत्री त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील आणि राज्यातील ‘महायुती’ च्या सरकारचा गाडा दुप्पट वेगाने धावेल, याची पूर्णपणे खात्री आहे. असेही मानकर म्हणाले.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये