पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, आरोपीने दहा लाख रूपयेही उकळले

पुणे : मैत्रीतून काढलेली छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित माजी नगरसेविकाने सचिन मच्छिंद्र काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी काकडे आणि पीडित नगरसेविकेचे खुप दिवसापासून मैत्री संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफित व्हायरल करण्याची धमकी काकडे याने माजी नगरसेविकेला दिली. त्यानंतर त्याने माजी नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. सन २०१७ पासून माजी नगरसेविकेला धमकावून काकडे यांनी अत्याचार केले होते. यासोबत पीडिताकडून दहा लाख रूपये देखील उकळले.
दोन दिवसांपुर्वी काकडे तिच्या घरी गेला. तु दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने पीडित नगरसेविकेला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. यापुढील तपास आपोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे करीत आहे.













