महाराष्ट्रराजकीय

शंभर दाऊद आले तरी शिवसैनिकाच्याही केसाला धक्का लावू शकत नाही. – पळसकर


पुणे : मातोश्री हे आम्हा शिवसैनिकाचे धर्ममंदीर आहे . असे शंभर दाऊद आले तरी तरी शिवसेना पक्ष प्रमुख काय शिवसैनिकाच्या ही केसाला सुद्धा धक्का लावु शकत नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया युवासेनेचे राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी दिली आहे.

‎मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एका ‎अज्ञात व्यक्तीने फोन करून हि धमकी दिली आहे. उध्दव ठाकरे यांना ठार मारणार, मातोश्रीला बॉंबस्फोटांनी उडवणार अशी धमकी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पळसकर म्हणाले, दाऊद ने मातोश्री पर्यंत जाण्याचा विचारही करु नये. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत दाऊद तु पोहचूच शकत नाही. पण सर्वसामान्य शिवसैनिकाच्या ही केसाला धक्का लावू शकत नाही. अशी प्रतिक्रिया पळसकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये