पुणे शहर

पुण्यातील बालेवाडी येथील “श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाचे” गुगल मॅप वर ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे नाव, कारवाई करण्याची अमोल बालवडकर यांची मागणी…

पुणे : पुणे शहरातील महाळुंगे-बालेवाडी येथे असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर बदलण्यात आले असून अज्ञात समाजकंटकांनी या क्रीडा संकुलाचे नाव बदलून ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे केल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तातडीने बाणेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, “आमच्या भागातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बदलले आहे. यामुळे भागातील शिवप्रेमी, खेळाडू आणि नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. अशा समाजकंटकांवर तातडीने कारवाई करावी.”

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

अमोल बालवडकर यांनी पुढे सांगितले की, गुगल मॅपवर जाऊन अशा प्रकारे लोकेशन एडिट करणे आणि नाव बदलणे हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हा तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर असून, याचा गैरफायदा घेऊन इंटरनेटवरील हॅकर इतरही गुन्हे करू शकतात. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, गुगल मॅपवरील हे बदललेले नाव त्वरित पूर्ववत करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये