पुणे शहर
भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया आघाडीच्या उपाध्यक्ष पदी चिन्मय मुसळे यांची नियुक्ती
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडिया आघाडीच्या उपाध्यक्षपदी चिन्मय मुसळे यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
चिन्मय मुसळे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय काम करीत आहेत. मुसळे म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आहे. या पदाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले आहे. सोशल मीडिया वर पक्षाची भूमिका मांडण्याचे काम करणार आहे. तसेच या माध्यमातून नवीन लोक पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.