पुणे शहर

कर्वेनगर मध्ये मास्क, सोशल डिस्टेंसिंगच्या कारवाईत  पालिकेकडून १७००० रुपये दंड वसूल

कर्वेनगर : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने पुणे महापालिकेनेही कडक निर्बंध लागू केले आहेत.  सध्या नागरिकांमध्ये मास्क व सोशल डिस्टेंसिंगबाबत निष्काळजीपणा दिसत असल्याने पालिकेच्या वतीने कडक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. आज वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत नागरिक व्यवसायिकांकडून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. In Karvenagar, a fine of Rs. 17,000 was recovered from the municipality for the action of mask and social distance

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मधुकर कारकुड व गणेश खिरीड   यांच्या नियंत्रणाखाली कर्वेनगर डी. पी. रस्त्यावर म्हात्रे पुल ते राजाराम पुल दरम्यान विनामास्क धारक व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या नागरिक व व्यवसायधारकांवर कारवाई करण्यात आली.

IMG 20210222 WA0176

सदर कारवाई मध्ये आरोग्य निरीक्षक राजेश आहेर, किरण जाधव, सचिन सावंत व नंदा प्रताप ,अतिश बोर्डे, राहुल शेळके, आरोग्य निरिक्षक ,सर्व मोकादम, सेवक यांनी केली. या कारवाईमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून एकूण   ११००० रुपये व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्याकडून ६००० रुपये असा एकूण १७००० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

IMG 20210221 WA0180

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये