संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती दिन थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

पुणे : संतशिरोमणी नामदेवमहाराज राष्ट्र संत असल्याने त्यांचा जयंती दिन हा राज्य शासनाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा या संदर्भात आपण तत्काळ मुख्यमंत्र्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. तसेच शिंपी समाजातील गरजू विद्यार्थी व समाज बांधव यांच्या मदतीसाठी एखादी संस्था स्थापन करू असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना आज दिले. Will try to include Sant Shiromani Namdev Maharaj’s jayantidin in the list of great personalities: Chandrakant Patil
महाराष्ट्र शासनाने दि १४ जानेवारी २०२१ रोजी एका परिपत्रकाद्वारे मंत्रालय तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करण्याबाबत एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत संत नामदेव महाराज यांच्या जयंती दिनाचा समावेश नसल्याने समस्त शिंपी समाजाच्या वतीने भाजप पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसुले व माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन संतशिरोमणी नामदेवमहाराज राष्ट्र संत असल्याने त्यांचा जयंती दिन हा राज्य शासनाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा या मागणीचे निवेदन त्यांना दिले.

यावेळी पाटील यांना भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात अरुण काळे, वसंतराव हंगेकर ,दत्तात्रय मांढरे, अरुण धोंगडे, मोहन मेटे , प्रशांत बारटक्के, गौरव खैरनार आदी सहभागी होते. यावेळी पाटील यांनी याबाबत तातडीने आपण मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असून शिंपी समाजातील गरजू विद्यार्थी व समाज बांधव यांच्या मदतीसाठी एखादी संस्था स्थापन करण्यासंदर्भातही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
