पुणे शहर

पुण्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन ; जोरदार घोषणाबाजी

पुणे : भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. हा फसवा विकास केला म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल आहे असे सांगत कार्यकर्त्यांनी “एप्रिल फुल” साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्यक्र्यायनी मोदी वाढदिवसाचा केक कापत निषेध नोंदवला. दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार, प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या परंतु यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.

आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहार्ध्यक्ष किशोर कांबळे, अभिषेक बोके, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,मयुर गायकवाड, महेश हांडे, अब्दुल हाफिज, दिपक कामठे आनंद सागरे, गिरीष गुरुणांनी, कुलदिप शर्मा,भूषण बधे,उपस्थित होते.

पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन (पहा व्हिडिओ)
Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये