पुणे शहर

मारटकर यांच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा : नीलम गोऱ्हे

पुणे : पुण्यात युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या झालेल्या खुनाच्या मागे असणाऱ्या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील दीपक विजय मारटकर यांच्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता व  चाकूने वार करत खून केला आहे. या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी. व हे सर्व खुनी सराईत आहेत का ? त्या अनुषंगाने पोलिस चौकशी करावी. असे लेखी निवेदन गोऱ्हे यांनी  देशमुख यांना दिले आहे. 
मारेकरी पळून जाताना त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ उपलब्ध करुन घ्यावेत. सर्व खुनी व्यक्तींना तात्काळ अटक करावी, या खुना मागे कोणी सूत्रधार आहेत का याचाही शोध घ्यावा,  खून केलेल्यांना जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडी मागावी, खुनी व्यक्ती यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का ? हे तपासून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी. या खुनी व्यक्तींना जास्तीत जास्त शिक्षा होईल हे पहावे. तपास व चार्जशीट कार्यक्षम व काटेकोरपणे व्हावा. यासाठी संबंधित पोलिस आयुक्त यांना सूचना देण्यात याव्यात अशी विनंती गोऱ्हे यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये