कोथरुड
भाजपा कोथरुड मंडल ओबीसी आघाडीची कार्यकारीणी जाहीर

कोथरुड : कोथरुड भाजपा कोथरुड मंडल ओबीसी आघाडीची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
अंबर हॅालमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास शहराध्यक्ष जगदीश मुळीक , ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे, ओबीसी आघाडीचे पुणे शहर सरचिटणीस विनोद मोहिते, कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, नवनाथ जाधव, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कोथरुड मंडल ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले होते.



