महाराष्ट्र

अशोक चव्हाण नॉट रिचेबल, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. 

भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील, असे वक्तव्य केले होते. 

Img 20240212 wa00042623003439716079283

भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. 

Img 20240212 1145077317934526481708588

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

Img 20240202 wa00034606059587729487622
Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये