राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष; अधिवेशन नेमके होणार कधी?

तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलवल असून या अधिवेशनात सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकार राहणार की जाणार हे आता 30 तारखेला गुरुवारी ठरणार आहे. या दिवशी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर निर्णय होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. असा मेसेज सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. अखेर राजभवन च्या वतीने अशी कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज रात्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणीचे मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली असून याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आज दिल्लीत फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर फडणवीस मुंबईत दाखल झाले त्याचवेळी आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अशा भाजप नेत्यांबरोबर राज्यपालांची भेट घेतली असल्याने सत्ता नाट्याला आता वेग आला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असून या सरकारचं भवितव्य आता 30 तारखेला होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये ठरणार आहे. सरकार राहणार की जाणार याचा निर्णय आता 30 तारखेला गुरुवारी ठरणार आहे. अशी माहिती समोर आली होती.



