पुणे शहर

भीम आर्मी भारत एकता मिशन पुणे जिल्हा अध्यक्षपदी  पंडागळे

पुणे : भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रमुख नेहा शिंदे व महाराष्ट्र-महासचिव सीताराम गंगावणे यांच्या नेतृत्वात, भीम आर्मी भारत एकता मिशन पुणे जिल्हा अध्यक्ष(प्रमुख) पदी अमर पंडागळे यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी पुणे शहर अध्यक्ष अभिजीत गायकवाड व पुणे जिल्हा महासचिव मनाेज खैरे उपस्थित हाेते.  फुले-शाहू आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रामाणिक राहून अन्याय अत्याचार विरोधात काम करुन संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे पंडागळे यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये