गद्दार संजय गायकवाड यांनी कुणावर बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच शिवसैनिकांचा हल्लाबोल

मुंबई : सच्चा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही, असं म्हणत बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यावर आता शिवसेना नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी संजय जाधवांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी गद्दारी केली. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. त्या बंडखोरांबाबत बोलने म्हणजे एकप्रकारे विनोदच म्हणावा लागणार आहे. यापुढे गद्दार संजय गायकवाड यांनी राज्याच्या कोणत्याही भागातून निवडणूक लढवून दाखवावी. त्याला शिवसैनिक आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा प्रशांत जाधव यांनी संजय गायकवाड यांना दिला आहे.

काल एका पत्रकार परिषदेमध्ये संजय गायकवाड यांची विरोधकांवर टिका करताना त्यांची जीभ देखील घसरली. विरोधक आघाडी करून तुमची राजकीय कोंडी करू शकतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक तुम्हाला लक्ष्य करू शकतात. याचं उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, वीरो के दुश्मन होते है, शेरों के ही दुश्मन होते है, हि** का कोई शत्रू होता है क्या? असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे ते या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्रित निवडणुकां लढणार असल्याचं दोन्ही बाजूंनी स्पष्ट केलं आहे. भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. हे गेल्या काही घटनांवरून आपल्याला दिसून येईल. यातच शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गट भाजपला मिळला आहे. त्यांचा निभाव भाजपसोबत आगामी निवडणुकांमध्ये लागणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.



