पुणे शहर

देशासमोरील आव्हानाचा उल्लेख करत डॉ. बाबा आढावांनी उपस्थित केला ‘हा’ एक प्रश्न

पुणे : देशासमोर सध्या हिंदुत्व आणि अध्यात्माच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. समाजासाठी हे घातक आहे. गेल ऑम्वेट यांनी सत्यशोधक चळवळीवर संशोधन व अभ्यास करत या चळवळीत स्वतःला झोकून दिले. मग भारतातील बाकीच्या डाव्यांना का सत्यशोधक चळवळीचा शोध घ्यावा वाटला नाही, असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला आहे.

दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या विचारधारेवर आधारित विविध चार पुस्तकांचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर, डॉ. लता प्र.म., डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. गेल ऑम्वेट वारसा गटाच्या समन्वय डॉ. नागमणी राव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, कन्या प्राची पाटणकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, ‘गेल ऑम्वेट ही एक अमेरिकन मुलगी भारतात येते. इथल्या मातीत मिसळून जाते. तिने सत्यशोधक चळवळीवर संशोधन करून या चळवळीत स्वतःला झोकून दिले. सत्यशोधक चळवळीचा शोध घ्यावा असे भारतातील बाकीच्या डाव्यांना का वाटले नाही? यावेळी डॉ. भारत पाटणकर आणि प्राची पाटणकर यांनी लिहिलेल्या ‘झपाटलेले सहजीवन – परंपरा मोडणारी परंपरा’, प्रा. संजयकुमार कांबळे यांनी संपादित केलेल्या ‘डॉ. गेल ऑम्वेट समाजशास्त्रीय आकलन’ व ‘गेल ऑम्वेट समजून घेताना’ आणि एका इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजयकुमार कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बाबर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये