देशविदेश

मोठी बातमी- डीआरडीओने विकसित केलेल्या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे.(Big news- Emergency use of anti-covid drug developed by DRDO)

IMG 20210430 WA0001

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी  2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण  क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित  रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.

IMG 20210507 WA0009

डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केलं होतं. यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. या आधारे डीसीजीआयने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला होती. 2DG औषधाच्या ट्रायलचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांमध्ये घेण्यात आला आणि देशभरातील 11 रुग्णालयात फेज  (डोस रेंज) क्लिनिकल चाचणी घेण्यात आली.  दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये