देशविदेश

कोरोना बाबतीत रुग्णालयात ॲडमीट होण्यासाठी केंद्राची नवीन नियमावली जाहीर..

दिल्ली : कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. नवीन करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवालाची गरज नसणार आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयित व्यक्तीलाही या नियमानुसार आता रुग्णालयात भरती करता येणार आहे. रुग्णाच्या लक्षणानुसार त्याला वॉर्ड सीसीसी डीसीएससी, डीएससी मध्ये भरती करता येणार आहे. Center announces new rules for hospitalization in case of corona.

नव्या नियमानुसार रुग्ण कोणत्याही शहराचा असला तरी त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार देता येणार नाही. रुग्णा जवळ ओळखीचा पुरावा नसला तरी त्याला प्रवेश नाकारता येणार नाही व कोणत्याही व्यक्तीला ऑक्सिजन औषध देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

IMG 20210430 WA0001

रुग्णालयात ॲडमीट करण्याची गरज नसतानाही एखादा रुग्ण बेड तर अडवून ठेवत नाही ना हे पाहणे देखील बंधनकारक असल्याचे नवीन नियमावलीत सांगण्यात आले आहे. येत्या तीन दिवसात सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत.

IMG 20210507 WA0009

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये