भाजपकडून बावधन बुद्रुकच्या प्रभारी नगरसेवकपदी किरण दगडे पाटील यांची निवड ; आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती..
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने बावधन बुद्रुक च्या प्रभारी नगरसेवक पदी निवड किरण दगडे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरिश बापट, शहराध्यक्ष जगदिशजी मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. BJP elects Kiran Dagde Patil as Bavdhan Budruk’s in-charge corporator; Strategies for the upcoming municipal elections ..
भाजपच्या वतीने पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये महापालिकेतील भाजप नगरसेवकांची प्रभारी नगरसेवक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही प्रभारी नगरसेवकांची यादी जाहीर केली आहे.
किरण दगडे पाटील हे सध्या प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी, बावधन खुर्द या भागात भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच नव्याने समाविष्ट करण्यात बावधन बुद्रुक मध्ये त्यांचा संपर्क चांगला आहे व या गावात त्यांच्या पत्नी पियुशा दगडे पाटील या सरपंच आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने बावधन बुद्रुकची त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली प्रभारी नगरसेवकाची जबाबदारी भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे.
या निवडी नंतर बावधन बु. ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने किरण दगडे पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची ही चांगली रणनीती मानली जात आहे.
भारतीय जनता पार्टी ने इतर समाविष्ट गावांमध्ये अशाच प्रकारे प्रभारी नगरसेवकांची निवड करून त्या त्या भागात आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

इतर समाविष्ट गावातील प्रभारी नगरसेवकांची यादी..
बावधन बुद्रुक – किरण दगडे पाटील
सुस – अमोल बालवडकर
म्हाळुंगे – ज्योती कळमकर
लोहगाव – योगेश मुळीक
वाघोली – अनिल टिंगरे
वडाचीवाडी – आदित्य माळवे
उंड्री – श्रीनाथ भिमाले
पिसोळी – सरस्वती शेंडगे
फुरसुंगी – मारुती तुपे
उरुळी देवाची – मनीषा कदम
होळकरवाडी – धनराज घोगरे
हांडेवाडी – अजय खेडेकर
मांजरी – उज्ज्वला जंगले
शेवाळवाडी – कलींदा पुंडे
केशवनगर – स्वप्नाली सायकल
साडे सतरा नळी – उमेश गायकवाड
शिवणे – वृषाली चौधर
उत्तमनगर – दिलीप वेडे पाटील
कोंढवे-धावडे – अल्पना वर्पे



