वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावावे ; कवी राजेंद्र वाघ

विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि डॉ.भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
वारजे : वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावले तर पर्यावरण संतुलित राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैसर्गिक आणि नैतिक जबाबदारी आहे,असे मत कवी राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केले. Tree planting on the occasion of birthday of Leader of Opposition Deepali Dhumal and Dr. Bharti Chavan ..
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व गुणवंत कामगार कल्याण मंडळ अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने आयोजित वारजे टेकडीवर वृक्षारोपणप्रसंगी वाघ बोलत होते.

याप्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे संजय गोळे,संपत खैरे , बाळकृष्ण नेहरकर, राकेश सावंत , दिलीप नारखेडे ,भगवान चव्हाण, जयसिंग लावंड, निवास माळी, विनायक देशमुख, विश्वास फडतरे, दिलीप डोंगरे, शिवाजी घोरपडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपण व संवर्धन याकरिता उपस्थितांनी तयारी दर्शविली असून इतर अनावश्यक गोष्टी टाळून वाढदिवस साजरा करताना दरवर्षी किमान एक स्वदेशी झाड लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



