वारजे माळवाडीत भाजपकडून परिचारिकांचा सन्मान ; महामारीतील सेवा कार्याबद्दल कौतुक..

वारजे : गेली अनेक वर्ष सेवा परमो धर्म: हे ब्रीदवाक्य घेऊन सेवा करणाऱ्या वारजे माळवाडी परिसरातील हॉस्पिटलमधील परिचारिकांचा आजा जागतिक परिचारिका दिनानिमित्त सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. BJP honors nurses in Warje Malwadi
सचिन दांगट यांच्या वतीने गेली अनेक वर्ष वारजे माळवाडी परिसरातील विविध हाॅस्पीटल , क्लिनीक मधील साधारणतः १०० परिचारिकांचा ” जागतिक परिचारिका दिनानिमित्त सन्मान करण्यात येत असतो . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे सर्वांचा सन्मान करणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात शतायु हाॅस्पीटलच्या ३० परिचारिकांचा आज सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
दांगट म्हणाले की, गेली दीड वर्षे कोरोना महामारीच्या काळात सर्वच हॉस्पिटल मधील परिचारिकांनी केलेले सेवा कार्य कौतुकास्पद आहे . या सेवाकार्यात काही परिचारकांना तर आपला जीव गमावावा लागला आहे. पण न डगमगता परिचारिकांनी आपले कर्तव्य पार पाडले व कामात खंड पडू दिला नाही. परिचारिकांनी या संकट काळात केलेले काम कधीही विसरता येणार नाही.
याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, शामराव हुलावळे ,संदीप जाधव, डॉ.योगेंद्र पांडे, डॅा.एकता माने, डॅा.संदीप वाघ, डॉ .विनायक जाधव, डॉ. सचिन शिवनीतवार, डॉ.विलास मुंडकर, डॉ. ज्योती जाधव, युगेश दातार , विक्रम वाजे, किरण साबळे उपस्थित होते . वारजे माळवाडी परिसरातील उर्वरित सर्व हॅास्पीटल मधील परिचारिकांचा सन्मान लॅाकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे दांगट यांनी म्हंटले आहे.




