महाराष्ट्र

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं आज निधन झालं आहे. ते 81 वर्षाचे होते. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.

मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेला होता. सुधीर जोशी यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.

Img 20220217 wa0003

सुधीर जोशी हे शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. पहिल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपदही भूषावले आहे. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे. सुधीर जोशी यांनी 1999 मध्ये आजारपणामुळे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केलं. 1972 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1968 पासून ते विधान परिषद सदस्य होते. 1993-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये