महाराष्ट्र

झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र!!! संजय राऊतांचं ट्विट

मुंबई : शिवसेना खासदार संजय यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून थेट सक्तवसुली संचलनालयाला आव्हान दिले आहे. ईडी ही मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वरती आहे का? ईडीच्या माध्यमातून फेडरल सिस्टीमची वाट लावली जात आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईतील दादा हा शिवसैनिकच आहे, असं म्हटल्यावर संजय राऊत यांनी नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा छायाचित्र आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी, ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’, असा मजकूर लिहला आहे. 

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मी उपराष्ट्रपतींना पाठवलेले पत्र हा ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. इतके दिवस देशाचा प्रश्न आहे म्हणून मी गप्प बसलो होतो. 

आता तुम्ही पाहाच काय होतं. मी लवकरच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतरची पत्रकार परिषद मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर घेईन, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ईडीला या सगळ्याची किंमत मोजायला लागेल. मीदेखील याची किंमत मोजायला तयार आहे, अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांचे काही गैरप्रकार समोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुखांच्यासोबतच्या कोठडीत तुम्हाला पाठवू, अशी भाषा भाजपचे बिनबुडाचे नेते करत आहेत. आम्ही जाऊ. दादागिरी तुम्ही करताय. पण पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही खेचू. कारण तुमची पाप अधिक आहेत आणि आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाही तुम्हाला, असं राऊत पत्रकारपरिषदेत म्हणाले. पवार कुटुंबाच्या घरी 5 दिवस जाऊन हे ईडीचे अधिकारी बसले होते. ते सांगायचे या नेत्याचं नाव घ्या, त्या नेत्याचं नाव घ्या. हे पवार कुटुंबीयांच्या बाबतीत घडलं. हे आमच्या बाबतीत घडतंय. तुम्हाला काय वाटतंय आम्ही गुडघे टेकू, अजिबात नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये